WPL Live Cricket Score, DC vs MI Women’s Premier League 2024 : आज महिला प्रीमियर लीग 2024 चा 12 वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
या सामन्यात हरमनप्रीत कौरचे पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे ती गेल्या दोन सामन्यांत खेळताना दिसली नाही. आता दिल्लीच्या बालेकिल्ल्यात मेग लॅनिंगच्या सेनेला पराभूत करण्यात मुंबई यशस्वी होते का, हे पाहावे लागेल.
🚨 Toss Update 🚨
Mumbai Indians elect to bowl against Delhi Capitals at the Arun Jaitley Stadium.
Live 💻📱https://t.co/NlmvrPq6yj#TATAWPL | #DCvMI pic.twitter.com/Wh58esY5Zs
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 5, 2024
DC vs MI Live Score : दोन्ही संघाची प्लेइंग 11 खालीलप्रमाणे…
मुंबई इंडियन्स : यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, अमनजोत कौर, सजीवन सजना, हुमैरा काझी, शबनीम इस्माईल, सायका इशाक.
दिल्ली कॅपिटल्स : मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, एलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, राधा यादव, तानिया भाटिया (विकेटकीपर), शिखा पांडे, तीतास साधू.
दरम्यान, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत चार सामने झाले आहेत. यातील मुंबईने तीन सामने जिंकले आहेत तर दिल्लीने एक सामना जिंकला आहे.