Royal Challengers Bengaluru Owner : इंडियन प्रीमियर लीग 2008 मध्ये सुरू झाली आणि आज 17 वर्षांनंतर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ही सर्वात लोकप्रिय फ्रँचायझी बनली आहे. आरसीबी संघ जितका लोकप्रिय आहे तितकाच त्याचा मालक विजय माल्ल्या देखील त्याच्या भव्य जीवनशैलीमुळे तितकाच प्रसिद्ध राहिला आहे. ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिससह अनेक दिग्गज खेळाडू बेंगळुरू संघात खेळले आहेत. आज आरसीबी ही एक अशी टीम आहे ज्याला इंटरनेटवर लाखो लोक फॉलो करतात. आजही, विजय माल्ल्या अजूनही आरसीबीचा मालक आहे की नाही या चर्चा लोकांमध्ये पाहायला मिळतात.
अजूनही आरसीबीचा मालक आहे का विजय मल्ल्या?
2008 मध्ये जेव्हा RCB फ्रँचायझी अस्तित्वात आली तेव्हा विजय माल्ल्या याने ती विकत घेतली. वास्तविक, मल्ल्या त्यावेळी युनायटेड स्पिरिट्स नावाच्या कंपनीचे अध्यक्ष होता, पण आरसीबीला मल्ल्याने एकट्याने विकत घेतले होते. युनायटेड स्पिरिट्स ही यूबी ग्रुपची कंपनी आहे पण विजय मल्ल्या आता तिचा अध्यक्ष नाही. 2013 पासून मल्ल्या याच्यासाठी व्यावसायिक अडचणी वाढू लागल्या आणि 2016 मध्ये त्याला कंपनीच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. तो आर्थिक संकटाचा सामना करत होता आणि त्याच दरम्यान, 25 फेब्रुवारी 2016 रोजी, युनायटेड स्पिरिट्स कंपनीने एक विधान जारी केले की विजय मल्ल्या याने RCB फ्रँचायझीमधील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. यासोबतच त्याने आरसीबीचे संचालकपदही सोडले. याचा अर्थ विजय मल्ल्या शेवटचा 2016 मध्ये RCB फ्रँचायझीचा मालक म्हणून दिसला होता.
आता आरसीबीची मालकी कोणाकडे आहे?
विजय मल्ल्या यांनी RCB सोडले असले तरी संघाची मालकी आता विजय मल्ल्याऐवजी युनायटेड स्पिरिट्स कंपनीकडे गेली आहे. मल्ल्या आता युनायटेड स्पिरिट्स कंपनीत नसल्याने त्याचा आता आरसीबी फ्रँचायझीशी कोणताही संबंध नाही. मल्ल्या सध्या युनायटेड ब्रुअरीज ग्रुपचा अध्यक्ष म्हणून काम करत आहे, जी मद्य व्यवसायात गुंतलेल्या जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे.
आयपीएलमधील आरसीबीच्या यशावर एक नजर….
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला कदाचित कधीच आयपीएल चॅम्पियन बनता आले नसेल, पण हा संघ अनेक वेळा प्लेऑफच्या माध्यमातून क्वालिफायर आणि अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला आहे. RCB त्याच्या इतिहासात 8 वेळा प्लेऑफमध्ये पोहोचला आहे आणि हा संघ शेवटचा 2022 मध्ये टॉप-4 मध्ये दिसला होता. याशिवाय 2009, 2011 आणि 2016 मध्येही आरसीबीने अंतिम फेरी गाठली होती, परंतु प्रत्येक वेळी त्यांना निराशेचा सामना करावा लागला. आयपीएल 2023 मध्ये RCB टेबलमध्ये सहाव्या स्थानावर होता. आयपीएल 2024 मध्ये अजूनही साखळी सामने सुरू आहेत. सध्या आरसीबीचा संघ हा गुणतालिकेत 8 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. त्यांचा 11 सामन्यांत 4 मध्ये विजय तर 7 मध्ये पराभव झाला आहे.