मिराई असेट फोकस्ड फंड

मिराई असेट फोकस्ड म्युच्युअल फंडाचा सध्या एनएफओ (न्यू फंड ऑफर) चालू आहे. 7 मे 2019 पर्यंत हा फंड गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे. हा फंड लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप वर्गातील 30 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार आहे.

सध्या हा फंड गुंतवणुकीसाठी खुला आहे. 30 पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये गुंतवणूक न करणारा फंड हा फोकस्ड फंड अशी व्याख्या सिक्युरिटीज अँड एक्सेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) केली आहे. त्यामुळे मल्टीकॅप फंड म्हणून मिराई असेट फोक्स्ड फंड़ विविध क्षेत्रातील आणि लार्ज, मिड आणि स्मॉलकॅप वर्गातील 30 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार आहे.

डायव्हर्सिफाईड वर्गातील फंडामध्ये सतत नवीन स्टॉकयेत असतात, काही स्टॉकमधील गुंतवणूक कमी केली जात असते. इथे मात्र तीस खणखणीत स्टॉकमध्ये गुंतवणूक असणार आहे. फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये टॉप 30 पेक्षा अधिक चांगल्या कंपन्या असतील असे फंड व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. या वर्गातील फंडांनी याआधी चांगली कामगिरी केलेली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.