क्रेडिट कार्डचा वापर करताना… (भाग-१)

दोन दशकांपूर्वी क्रेडिट कार्डची सुरवात झाली तेव्हा त्याचा वापर करण्यातील अज्ञानामुळे अनेकजण मोठ्या संकटात सापडले. वेळेवर बिल न भरणे, थकबाकीकडे दुर्लक्ष करणे, क्रेडिट कार्डवर रोख रक्कम काढणे आणि ठरलेल्या मुदतीत ती परत न करणे अशा अनेक गोष्टींमुऴे कार्डचा वापर करणारे अडचणीत आले. त्याचवेळी क्रेडिट कार्डचे व्यवस्थापन करणाऱ्यांनी जोरदार मार्केटिंग आणि दिसेल त्याला कार्ड दिल्यामुळे एकूणच हा क्रेडिट कार्ड व्यवसाय धोक्यात आला आणि आता तर या सगळ्या गोष्टी सिबिल स्कोअरमध्ये दिसू लागल्याने कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्याने सर्वसामान्यांनी क्रेडिट कार्डपासून लांब राहणे पसंत केले आहे. असे असले तरी क्रेडिट कार्डची उपयुक्तता संपलेली नाही.

फक्त वापरणाऱ्याने ते किमान शहाणपणाने वापरले तर सोयीचे ठरते. पहिली गोष्ट म्हणजे योग्य त्या करणासाठीच कार्ड घ्या- जर तुम्ही कार्ड घेणार असाल तर हातात पडेल ते पहिले कार्ड घेऊ नका. आर्थिक विश्वातील अनेक उत्पादनांपैकी क्रेडिट कार्ड सुद्धा काळजीपूर्वक आणि अभ्यास करून निवडले पाहिजे. लोक अनेकवेळा फक्त क्रेडिट कार्ड वरील क्रेडिट मर्यादा पाहून ते निवडण्याचा निर्णय घेतात. काही वेळेला क्रेडिट कार्ड घेताना आणि नूतनीकरण करताना लागणारे शुल्क बघितले जाते. मात्र क्रेडिट कार्ड संबंधित इतर घटकांचा विचार करणे पण महत्वाचे असते. ह्यामध्ये व्याजचा दर, बिलाचे आवर्तन, इतर शुल्क आणि उशिरा परतफेड करण्याबद्दलचा दंड इत्यादीचा समावेश होतो. अनेकदा क्रेडिट कार्ड गळ्यात मारताना लाईफटाईम फ्रीचा फंडा वापरला जातो. प्रत्यक्षात क्रेडिट कार्डसाठी तुम्ही जो फॉर्म भरून देता त्यात कुठेही लाईफटाईम फ्रीचा पर्याय नसतो किंवा उल्लेखही नसतो. मग अनपेक्षित पणे वार्षिक शुल्काचे बिल आले की वापर करणारा दचकून जातो. त्यामुळे लाईफटाईम फ्री वगैरे काही नसते आणि वार्षिक वापर शुल्क भरावेच लागते हे लक्षात घ्या.

योग्य तारखेला संपूर्ण रक्कम भरा

दर महिन्याला क्रेडिट कार्डाच्या बिलाच्या एकूण रकमेच्या केवळ ५ टक्के रक्कम भरणं अनिवार्यअसतं. त्यामुळे उरलेली रक्कम नंतर दिली तरी चालेल असा विचार न करता योग्य तारखेला (ड्यू डेट) संपूर्ण रक्कम देण्यावर कार्डधारकांनी भर द्यायला हवा. पुढील बिलिंग सायकलमध्ये उरलेल्या रकमेची सारखी भर पडत गेल्यास महिन्याला ३ ते ४ टक्के दराने व्याज भरावं लागेल. तसंच कार्डाची देय रक्कम वाढली असताना नवीन कार्डावर व्यवहार केल्यास त्याचा अतिरिक्त आर्थिक ताण पडू शकतो.

क्रेडिट कार्डचा वापर करताना… (भाग-२)

कार्डाचा मर्यादित वापर

कोणत्याही क्रेडिट कार्डावर खरेदी केल्यास ४५ दिवसांपर्यंतचा कालावधी हा बिनव्याजी म्हणजेच;इंटरेस्ट-फ्री पीरियडअसतो. थोडक्यात, खरेदी केल्यानंतर ४५ दिवसांपर्यंत खरेदीची रक्कम कोणत्याही अतिरिक्त रकमेविना (व्याज, पेनल्टी) देता येते. परंतु यासाठी थकबाकी शून्य असणं आवश्यक आहे. अनेकांकडे एकपेक्षा जास्त क्रेडिट कार्ड आहेत. अशांना ठराविक कार्डच तेही मर्यादित स्वरूपात वापरण्याचं सांगितलं जातं. क्रेडिट लिमिटच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम कार्डावर शक्यतो खर्च करू नये.

– चतुर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.