पाटण विधानसभा मतदारसंघाचे सदस्य म्हणून हॅटट्रीक करणारे तालुक्याचे लोकप्रतिनिधी मा. श्री. ना. शंभूराज देसाई हे राज्यात सत्तारूढ असलेल्या बाळासाहेबांची शिवसेना व भाजपा शासनातील वजनदार खात्याचे कॅबिनेट मंत्री असून ठाणे व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. दुर्गम, डोंगराळ व अविकसित अशी ओळख असलेला पाटण तालुक्याला ना. शंभूराज देसाई यांनी विकासाच्या प्रवाहात आणले असून तालुक्यात विकासाचा बँकलॉग भरून काढणे बाकी आहे. दोन टर्म केवळ आमदार असणारे शंभूराज देसाई हे आमदारकीच्या तिसर्या टर्ममध्ये राज्यमंत्री आणि आता कॅबिनेटमंत्री झाले आहेत. राज्याचे ऊत्पन्न वाढविणारे उत्पादन शुल्क हे महत्वाचे खाते त्यांच्याकडे असून ते ठाणे व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुडबूकमध्ये कायमच नंबर वनवर असणारे ना. शंभूराज देसाई हे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने पाटण तालुक्याच्या विकासासाठी निधीची चणचण भासणार नाही. पाटण तालुक्यात विकासाचा वारु चौ़फेर उधळून विकासकामाची आतिषबाजी होणे गरजेची आहे. त्यामुळे पाटण तालुक्याच्या विकासासाठी… पालकमंत्री मोहदय; होऊ द्या निधीची आतिषबाजी…! अशी अपेक्षा पाटण तालुक्यातील जनता व्यक्त करत आहेत.
महाराष्ट्रात ज्यांची तत्वशील राजकारणी म्हणून ओळख आहे, ज्यांच्या विचारांचा आणि कर्तुत्वाचा मापदंड आजही नव्या राजकारणी लोकांसाठी दीपस्तंभ आहे; असे महाराष्ट्राचे पोलादी पुरूष लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे बाळकडू व वारसा ही ओळख सोबत ठेवून स्वकर्तृत्वाने त्यांचे नातू पाटण तालुक्याचे लोकनायक असलेल्या शंभूराज देसाई यांनी अल्पावधीत निर्मांण केली आहे. वारसा हक्काने केवळ जन्म मिळतो. मात्र, स्वतःला समाजात सिध्द कऱण्यासाठी कर्तुत्व दाखवून द्यावे लागते. वारसा हक्काचा डाग न लावता स्वकर्तृत्वाने संघर्षातून स्वत:ची वेगळी ओळख निर्मांण करणारे शंभूराज आपण त्यातील एक आहात. तोच करारीबाणा 365 दिवस लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांसाठी सदैव उपल्ब्ध असलेला नेता, अतीशय कमी वयात कामाची व जबाबदारीची जाणीव झालेला प्रगल्भ बुध्दीमतेचा नेता, संवेदनशील, सुशील, हुषार, हजरजबाबी, नम्र, संयमी, शांत, अशी एक ना अनेक आभूषणे प्राप्त असलेल नेता म्हणजे ना. शंभूराज देसाई आहेत. दूर्गम, डोंगराळ व कायमच अविकसित असा शिक्का माथी मारलेल्या पाटण तालूक्यात विकासाचा इमला उभा केला जात आहे; ते केवळ शंभूराज देसाई यांच्यामुळेच. ना. शंभूराज देसाई हे असामान्य नेतृत्व आहेत.
साहेब हे शतकानुशतकातून काळाला पडलेले एक सुंदर स्वप्न आहेत. भारदस्त व्यक्तिमत्व, तेजस्वी नजर, धारधार वाणी यातून त्यांच्या असामान्यत्वाची प्रचीती येते. आ. शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्याच्या समग्र विकासाचे स्वप्न पाहीले. गेली 35 वर्षं अविकसीत व भकास असणार्या पाटण तालुक्यातील रानटी जीवन जगणार्या जनतेच्या जडशील जिवनात चैतन्य निर्माण केले. 35 वर्षाच्या एकहाती सत्तेला सुरूंग लावत पाटण तालुक्याच्या राजकारणात अशक्य असणारी गोष्ट शक्य करुन तालुक्यावर शंभूराज स्थापन केले. संघर्षांतून अगदी तावून-सुलाखून तयार झालेले नेतृत्व अशी ओळख असणारे शंभूराज हे पाटण तालुक्याच्या राजकारणातील नुसते नाव राहिले नाही; तर ती क्रांतीकारक अणुशक्ती झाली आहे. त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेक चढ-उतार आले. मानापमानाचे प्रसंग आले. तरी दुर्दम्य इच्छाशक्ती, आशावाद व प्रखर बुद्धीमतेच्या जोरावर ते पाटण तालुक्याच्या राजकारणातील बाजीगर ठरले आहेत.
स्वतःच्या भूमिकेवर कमालीची निष्ठा आणि त्यासाठी पडेल ती किमंत मोजण्याची तयारी हे त्यांच्या राजकारणाचे कसब आहे. कसल्याही फायदया-तोट्याचा विचार न करता जे योग्य वाटेल तेच करायचे, या करारी बाण्यामुळे त्यांनी समाजाच्या केवळ एका स्तरामध्ये स्थान निर्माण केले नाही; तर समाजाच्या सर्वच स्तरात दबदबा निर्माण केला आहे. तालुक्यातील जनता म्हणजे ना. देसाई यांचा श्वास आहे. आमदारांचे नामदार झालेले शंभूराज देसाई आजही कुटुंबासाठी कमी वेळ देवून हा श्वास घुसमटु देत नाहीत. मतदारसंघातील कामांचा पाठपुरावा, त्यासाठी मंत्रालयात केला जाणारा पाठपुरावा, मतदारसंघातून कामासाठी कार्यकर्ते व जनतेचे येणारे असंख्य फोन, मतदारसंघातील कार्यक्रम, स्थानीक नेत्यांचे रुसवे-फुगवे, तालुक्यातील युवक व तरूण सहकार्यांचा रोजगाराचा प्रश्न, विरोधकांकडून केली जाणारी अडवणुक व टार्गेट करण्यासाठी केली जाणारी टीका आणि राजकरण या सर्वाला ना. शंभूराज देसाई समर्थपणे तोंड देत आहेत. तालुक्यात ‘एक नेता… एक आवाज; केवळ अन् केवळ शंभूराज’अशी स्थिती असल्याने या सर्व भूमिका वठवत असताना त्यांचा कधी तोल गेला नाही.
एखादे काम झाले नाही; तर त्यांनी निराशेचा बडगा कधी आपल्या सहकार्यांवर काढला नाही. काम झाल्यावर समाधान व्यक्त करुन जे काम झाले नाही, त्यासाठी हसतमुखाने जोमाने पाठपुरावा करणारे ना. शंभूराज देसाई राज्यातील अनेकांसाठी कुतूहलाचा व अभिमानाचा विषय ठरला आहे. बलशाली महाराष्ट्राच्या या बाहुबली नेतृत्वाकडे राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचे अतीशय महत्वाचे असणारे उत्पादन शुल्क व सातारा आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे. या बाहुबली नेतृत्वाने दुर्गम, डोंगराळ अशी ओळख असलेल्या पाटण तालुक्याची ओळख बदलण्यासाठी छप्पर फाडके निधीची बरसात करून पाटण तालुक्यात विकासकामांची आतिषबाजी करावी. ना. शंभूराज देसाई साहेब यांनी यशाची सर्व शिखरे पार करून सहयाद्रीची मान कायम उंच ठेवावी. यासाठी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.