मुंबई – जामीनावर बाहेर आलेल्या शिवसेना नेते, खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांना ईडीकडून आज पुन्हा नोटीस बजाविण्यात आली आहे. विशेष पीएमएलए कोर्टातून संजय राऊत यांना जामीन देत असताना चौकशी व तपासासाठी सहकार्य करावे, अशी अट ठेवण्यात आली होती.
त्यामुळे पत्राचाळ प्रकरणातील तपास ईडीने अजूनही पुढे सुरू ठेवला असून याच प्रकरणातील चौकशीसाठी पुन्हा एकदा संजय राऊत ( Sanjay Raut ) यांना हजर राहण्यासंबंधी नोटीस पाठवण्यात आली आहे. 18 नोव्हेंबर रोजी संजय राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे.
राहुल गांधी उतरणार गुजरातच्या मैदानात, ‘या’ तारखांना होणार भव्य सभा
दरम्यान संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदे गटवार चांगलीच टीका केली. “बाळासाहेब ठाकरे हे या देशाचे आणि विश्वाचे आहेत. फक्त आपल्या हातातील खंजीर बाजूला ठेवा आणि मग स्मारकाला हात जोडायला जा. कोणीही असो मी कोणाचे नाव घेत नाहीए पण खंजीर बाजूला ठेवा आणि मग आशीर्वादासाठी जा” असं संजय राऊत यावेळी म्हणाले. सध्या काय सुरु आहे काय होतंय बाळासाहेब ठाकरे सर्व पाहत आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत खंजीर खुपसणाऱ्यांचं भलं झालेलं नाही हा इतिहास आहे असही राऊत यावेळी म्हणाले.