वाघोली – प्रहार संघटना व सारंगी सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाच्या वतीने वाघोली येथे बच्चू कडू यांची राज्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल पुस्तक तुला करण्यात आली. ही पुस्तके ग्रंथालयासाठी देणार असल्याचे प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांनी सांगितले.
यावेळी शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार विजेते पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अण्णासाहेब पठारे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिजीत कटके यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी वाघोली येथील आजी-माजी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी तसेच प्रहार संघटनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.