मुंबई – रजनीकांत यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अभिनेत्याच्या 170 व्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. आज लायका प्रोडक्शनने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून याची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जय भीम फेम दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल करणार आहेत. रजनीकांत सध्या त्याच्या आगामी ‘जेलर’ चित्रपटात व्यस्त आहेत. त्याचा हा १६९ वा चित्रपट आहे.
लायका प्रॉडक्शनचे चेअरमन सुभास्करन यांच्या वाढदिवसाच्या खास मुहूर्तावर रजनीकांत यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी अनिरुद्ध रविचंदर यांच्या खांद्यावर असणार आहे. सध्या या चित्रपटाच्या शीर्षकाबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 2024 पर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
“सुपरस्टार रजनीकांतसोबतच्या आमच्या पुढील चित्रपटाची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या चित्रपटाला रसिकांचे भरभरून प्रेम मिळेल याची आम्हाला खात्री आहे” अशा आशयाची पोस्ट लायका प्रोडक्शन करून करण्यात आली आहे.
We are feeling honoured to announce our next association with “Superstar” @rajinikanth 🌟 for #Thalaivar170 🤗
Directed by critically acclaimed @tjgnan 🎬 Music by the sensational “Rockstar” @anirudhofficial 🎸
🤝 @gkmtamilkumaran
🪙 @LycaProductions #Subaskaran#தலைவர்170 🤗 pic.twitter.com/DYg3aSeAi5— Lyca Productions (@LycaProductions) March 2, 2023
रजनीकांतच्या ‘जेलर’बद्दल बोलायचे झाले तर, नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग जेलमध्ये झाले आहे. कन्नड सुपरस्टार शिवा राजकुमारही या चित्रपटाद्वारे तमिळमध्ये पदार्पण करत आहे. त्याचबरोबर मोहनलाल यात कॅमिओ करताना दिसणार आहे. याशिवाय योगी बाबू, त्रिशा कृष्णन, तमन्ना भाटिया, जॅकी श्रॉफ आणि सुनील हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.