महागाई ! पेट्रोल नंतर आता ‘दूध’ही होणार महाग; 1 मार्चपासून 12 रूपयांनी वाढू शकते किंमत

नवी दिल्ली – एकीकडे पेट्रोलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत त्यातच आता दूसरीकडे दुधाचे दर देखील वाढणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर अधिकच भार पडणार आहे.

दुधाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. दुध उत्पादक कंपन्यांनी मागणी केली आहे की दूधाचे दर 55 रूपये प्रति लिटर पर्यंत करण्यात यावे. कारण पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे दूध कंपन्या अडचणीत आहेत. तसेच रतलाम येथील काही उत्पदकांनी किंमती वाढवण्याचा निर्णयही घेतलेला आहे.

रतलाम मिल्क प्रोड्यूसर्स असोसिएशननुसार, मंगळवारी 25 गावांची एक बैठक झाली असून त्यात दूधाचे दर वाढवण्यात सर्वांनी सहमती दर्शवली आहे. 1 मार्चपासून दूधाचे दर वाढणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

करोना काळात दर वाढले नव्हते –
दूध उत्पादकांनी गेल्या वर्षी देखील दूधाच्या किंमती वाढवण्याची मागणी केली होती. मात्र, करोनाच्या साथीमुळे दर वाढवण्यात आले नव्हते. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी ज्या किंमतीला दूध विकले जात होते आजही त्याच किंमतीत विकले जातेय. सध्या मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यात 43 रूपये प्रतिलिटर दराने दूध विकले जात आहे. ते 12 रूपयांनी वाढवून 55 रूपये प्रतिलिटर केले जाणार आहे.

इंधन दरवाढीचा परिणाम –
शहरात सध्या पेट्रोलचे दर 100 रूपये प्रतिलिटर झाले आहेत. त्यामुळे दूधच्या वाहतूकीचाही खर्च वाढला आहे. त्याचबरोबर जणावरांच्या चाऱ्याचाही खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे पशुपालन करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. जर दूधाचे दर वाढले नाही तर लोक आंदोलन करतील आणि दूध वितरण थांबवले जाईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.