नवी दिल्ली – चेन्नई सुपर किंग्जचे फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत.
याआधी गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी यांच्यासही काही जणांना करोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ करोनाच्या विळख्यात अडकत चालल्याने आयपीएलचा 14 हंगाम स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर करण्यात आलेल्या
चाचणीमध्ये मायकल हसी यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याचे दोन्ही अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.