कोल्हापूर – गोकुळ दूध संघ येत्या काही दिवसात ऑक्सिजन प्लांट उभा करणार असल्याची घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. आज नूतन संचालकांच्या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली आहे.
गोकुळ हा सर्व सामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांचा संघ आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना कोणतीच अडचण येऊ नये यासाठी संचालक मोठी जबाबदारी आहे. किमान दोन संचालक गोकुळच्या कार्यालयात रोज असायला हवेत या पद्धतीने संचालकांनी कामाला लागावे, दूध उत्पादकाला थेट संचालकांना भेटता येईल, त्यांच्या समस्या सोडवता येईल, या दृष्टीने प्रयत्न करा. असे पालकमंत्री यांनी सांगितले. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दोन रुपये दूध दरवाढ देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून येत्या दोन महिन्याच्या कालावधीत यावर अभ्यास करून आश्वासने पूर्ण केली जातील, असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
14 मे रोजी होणार अध्यक्ष निवड
4 मे रोजी निवडणूक प्रक्रियेची मतमोजणी पार पडल्यानंतर राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे पॅनल गोकुळ दूध संघावर निवडून आले आहे. गोकुळ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे. मात्र अध्यक्षपदाची निवडणूक 14 मे रोजी होणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.