MI vs RR Live Score : आज IPL 2024 चा 14 वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे. वानखेडेवर होणाऱ्या या मॅचमध्ये राजस्थानने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय राजस्थानच्या चांगलाच पथ्यावर पडला आणि मुंबईची सुरुवात खराब झाली. कॅप्टन पंड्या आणि तिलक वर्मा व्यतिरिक्त एकही बॅट्समनला मैदानावर टिकून खेळता आलं नाही आणि मुंबईने केवळ 125 रन्सपर्यंत मजल मारली. आता राजस्थानला जिंकण्यासाठी 126 रन्सची आवश्यता आहे.
बॅक टू बॅक मोठे धक्के
मुंबई इंडियन्सची सुरुवात धक्कादायक झाली आहे. रोहित शर्मा आणि नमन धीरला ट्रेंट बोल्टने त्याचा मारा करत मुंबईला दोन मोठे धक्के दिले. या सामन्यात दोघेही खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर बोल्टने मुंबईला १४ रन्सवर आणखी एक धक्का देत डेवॉल्ड ब्रेविसला तंबूत पाठवले. त्यानंतर मुंबईला ईशान किशनच्या रूपात (16) आणखी एक झटका बसला. | MI vs RR Live Score
हार्दिक आणि तिलकची महत्वाची भागीदारी
हार्दिक पांड्या आणि टिळक वर्मा यांच्यात चांगली भागीदारी पाहायला मिळाली. दोघांनी काही काळ डाव सावरण्याचा प्रयत्न केला.मात्र चहलने पांड्याला (३४) आऊट करत ही जोडी फोडली. दोघांनी ५६ रन्सची महत्वाची भागीदारी केली. त्यानंतर मैदानात आलेले पियुष चावला देखील फार काळ टिकू शकला नाही.
त्यानंतर युझवेंद्र चहलने तिलक वर्माला आऊट करत राजस्थानला आणखी एक महत्वाची विकेट मिळवून दिली. 29 चेंडूत 32 धावा करून वर्मा माघारी परतला. तेव्हा टीमची हालत 14 षटकांनंतर 97/7 अशी होती.मुंबईने बोर्डावर शंभर रन्स पार करताच चहलने आणखी एक धक्का देत गेराल्ड कोएत्झीला हेटमायरकरवी झेलबाद केले. त्याला केवळ चार धावा करता आल्या. | MI vs RR Live Score
राजस्थानच्या चहल आणि बोल्टच्या भेदक माऱ्यासमोर मुंबईच्या बॅट्समन्सने शरणागती पत्करलेली पाहायला मिळाली. मुंबईने लडखडत अडखळत वीस ओव्हर्स पूर्ण खेळत 9 विकेट्स गमावून 125 रन्स केले.
Innings Break ‼️
An impressive bowling and fielding performance restricts #MI to 125/9👌👌
Will #RR be the second away team to win this season? 🤔
Scorecard ▶️ https://t.co/XL2RWMFLbE #TATAIPL | #MIvRR pic.twitter.com/g61btpmOPy
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2024
अशी आहे प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स
इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह, क्वान माफाका.
राजस्थान रॉयल्स
यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल. | MI vs RR Live Score