MI vs RR Live Score : मुंबईने दिलेल्या १२५ रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानची सुरुवात देखील मुंबई प्रमाणे खराब झाली. यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलरने राजस्थानच्या डावाची सुरुवात केली. अवघ्या 10 रन्सवर राजस्थानला पहिला धक्का बसला.
क्वेन मफाकाने यशस्वीला पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट करत मुंबईला पहिली विकेट मिळवून दिली. त्यानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन 12 धावा करून बाद झाला. आकाश मधवालने त्याला आपला शिकार बनवले आणि राजस्थान चांगलीच अडचणीत आली. त्यानंतर पराग आणि बटलर मैदानात खेळात होते. 6 ओव्हर्समध्ये राजस्थानने 2 विकेट्स गमावून बोर्डावर 46 रन्स लावले. | MI vs RR Live Score
Match 14. WICKET! 4.2: Sanju Samson 12(10) b Akash Madhwal, Rajasthan Royals 42/2 https://t.co/XL2RWMGj1c #TATAIPL #IPL2024 #MIvRR
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2024
मुंबईची सुरुवात देखील खराब झाली होती
आज IPL 2024 चा 14 वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे. वानखेडेवर होणाऱ्या या मॅचमध्ये राजस्थानने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय राजस्थानच्या चांगलाच पथ्यावर पडला आणि मुंबईची सुरुवात खराब झाली. कॅप्टन पंड्या आणि तिलक वर्मा व्यतिरिक्त एकही बॅट्समनला मैदानावर टिकून खेळता आलं नाही आणि मुंबईने केवळ 125 रन्सपर्यंत मजल मारली. | MI vs RR Live Score
हार्दिक आणि तिलकची महत्वाची भागीदारी
हार्दिक पांड्या आणि टिळक वर्मा यांच्यात चांगली भागीदारी पाहायला मिळाली. दोघांनी काही काळ डाव सावरण्याचा प्रयत्न केला.मात्र चहलने पांड्याला (३४) आऊट करत ही जोडी फोडली. दोघांनी ५६ रन्सची महत्वाची भागीदारी केली. | MI vs RR Live Score