वाघोली – शिवनेरी किल्ल्यावरून ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रमाचा प्रारंभ भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष राहुल लोणीकर, भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ व भाजपा जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे पाटील जुन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख आशाताई बुचके व भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस अनुप मोरे, प्रदेश उपाध्यक्ष निवेदिता एकबोटे यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गणेश कुटे, पुणे जिल्हा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप सातव यांनी दिली आहे.
स्वातंत्र्यासाठी हुतात्म्य पत्करलेल्या व वीर सैनिकांच्या स्मरणार्थ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी घोषित केलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ देशव्यापी आणि लोकाभिमुख अभियान अभियान देशभर राबविले जात आहे. शूरवीरांना श्रद्धांजली, ‘मिट्टी को नमन’ आणि ‘वीरों का वंदन’ हे ‘मेरी माटी, मेरा देश’ या अभियानाचे मुख्य उद्देश आहे.
आपल्या मातृभूमीसाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या वीरांप्रती आपल्या मनात असलेली अत्यंत आदराची व अभिमानाची भावना व्यक्त करण्यासाठी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने मेरी माटी, मेरा देश या अभियानांतर्गत आयोजित शिवनेरी किल्ल्यावर हा उपक्रम भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा युवा मोर्चा प्रभारी आणि भाजपा सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या हस्ते भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे पाटील,
जुन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख आशाताई बुचके, सरचिटणीस अनूप मोरे, सुशिल मेंगडे, सुदर्शन पाटसकर, प्रदेश उपाध्यक्ष निवेदिता एकबोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 15) सकाळी 9 वाजता होणार असून या राष्ट्रीय अभियानात युवक, युवती, नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेश महामंत्री सुदर्शन पाटसकर यांनी केले आहे.