मुंबई – बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल लवकरच लग्नबंधनात गलफ्रेंड द्रिशा आचार्यसोबत अडकणार आहे. करण आणि द्रिशाच्या लग्नाआधी देओलच्या घरात प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू झाले आहेत. अशात करण देओलचा मेहंदी सोहळा पार पडला.
करण देओलच्या मेहंदी फंक्शनचे काही खास फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये सनी देओल त्याची मेहंदी दाखवताना दिसत आहे. सनी पाजीच्या हातावर सर्व धर्मांची चिन्हे काढण्यात आली आहे. सनी पाजीची मेहंदी डिझाइन सर्व धर्म समभाव मेसेज देत आहे. या मेहंदी डिझाइनचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. सनी पाजीने तिच्या मुलाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये फिकट गुलाबी रंगाचा शर्ट आणि पांढरी पँट घातली होती.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये करण देओल कारच्या पुढील सीटवर बसलेला दिसत आहे. व्हिडिओमध्ये करण देओलच्या हातावर मेहंदीही स्पष्ट दिसत आहे. करणने द्रिशाचे नाव त्याच्या हातावर मेंदीने लिहिलेले आहे. पिवळ्या सिल्क कुर्त्यामध्ये करण डॅशिंग दिसत होता.
सनी देओलची होणारी सून द्रिशा चित्रपटात काम करत नसली तरी ती चित्रपटसृष्टीतील कुटुंबाचा एक भाग असल्याचे बोलले जात आहे. द्रिशा प्रसिद्ध चित्रपटनिर्माते बिमल रॉय यांची पणती आहे. द्रिशा एका ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्याचे सांगितले जाते.