पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पश्चित विभागीय औषधी वनस्पती सुविधा केंद्राचे उद्घाटन आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी केले. या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत औषधी वनस्पती लागवडीत वाढ करावी आणि त्यातून अधिकाधिक उत्पन्नात वाढ करावी, अशी अपेक्षाही कोटेचा यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदचे संचालक डॉ. तनुजा नेसरी, विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, वैद्य आप्पा खडीवाले, डॉ. विजय डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर होते. प्र-कुलगुरू डॉ. एस. एन. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, वित्त व लेखाधिकारी अतुल पाटणकर, विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, डॉ. गिरिश टिल्लू, वनस्पती विभागप्रमुख प्रा. ए. बी. आडे, सुविधा केंद्राचे संशोधक डॉ. डी. एन. मोकाट, उपसंचालक डॉ. के. एन. धुमाळ, शेतकरी प्रतिनिधी राजेंद्र गाडेकर, शशिकांत शिंदे, तसेच किरण अभ्यंकर आदी उपस्थित होते.
या सुविधा केंद्राद्वारे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, गोवा या राज्यांत व केंद्रशासित प्रदेश दमन दिव, दादरा नगर हवेली या भागांत औषधी वनस्पती मंडळाच्या मार्गदर्शनाखाली भरावी कार्य करावे, असे कोटेचा यांनी उद्घाटनप्रसंगी म्हणाले. याप्रसंगी कै. दादा खडीवाले यांच्या नावाने तयार केलेल्या रोग प्रतिकारक वनस्पती उद्यानाचे उद्घाटनही करण्यात आले.