पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या मूल्यमापन आराखड्याबाबत उच्च माध्यमिक शिक्षकांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी 1 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाइन नाव नोंदणी करावी लागणार आहे.
यंदा बारावीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आला असून पाठ्यपुस्तकेही नवीन उपलब्ध करून दिली आहेत. राज्य मंडळाने शासन मान्यतेने मूल्यमापन आराखडाही मंजूर केला आहे. याबाबत शिक्षकांनी प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.
यासाठी राज्य मंडळाच्या evaluation.mh-hsc.ac.in या वेबसाइटवर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. मुदतीनंतर नोंदणीची लिंक बंद होणार आहे, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले.