पुणे : महाराष्ट्र सरकारने कोरोनाव्हायरसशी मुकाबला करण्यासाठी कडक निर्बंध लादले आहेत. संचारबंदी व जिल्हाबंदी करण्यात आली असून यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.
अत्यावश्यक सेवेतील दावखाने, मेडिकल चालू आहेत. दरम्यान, शहरात नागरिक मेडिकल दुकानात ही ओषधे खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत.
यादरम्यान औषध विक्रेते आणि ग्राहक यांच्याकडून संसर्ग टाळण्यासाठी योग्य खबरदारी घेण्यात येत आहे.
पुण्यातील एका मेडिकलमध्ये विक्रेत्याने योग्य अंतर रहावे व संसर्ग होऊ नये यासाठी काउटंरजवळ दोरी बांधली आहे.
तसेच नोटांव्दारे संसर्ग टाळण्यासाठी डिजीटल पेमेंन्टची सुविधा देखील उपलब्ध केली आहे.