पुणे : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शहरात काही ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली आहे.
शहरातील टिळक चौक (अलका सिनेमा चौक) पासून पत्रकार भवन परिसरात औषध फवारणी करण्यात आली आहे. या परीसरासह सेनादत्त व दांडेकर पूल परिसरात औषध फवारणी करण्यात येत आहे.