दहशातवादाच्या पाठिराख्यांविरोधात उपाययोजना आखाव्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे “सार्क’ देशांना आवाहन

नवी दिल्ली : दक्षिण आशियाई देशांनी दहशतवाद आणि त्याला सहाय्य करणाऱ्यांना नामोहरम करण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखाव्यात असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. सार्क गटाच्या स्थापना दिनानिमित्त सार्कच्या सचिवालयाला लिहिलेल्या पत्रात त्यांनी या उपाययोजनांमुळे सार्क वरचा विश्वास वाढण्यास मदत होईल, असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

भारताच्या सार्कमधल्या सहभागाला दहशतवादाचा कृत्यांमुळे तसेच धमक्‍यांमुळे वारंवार आव्हाने दिल जात असल्याचे म्हणत त्यांनी पाकिस्तानलाही अप्रत्यक्षपणे टोला लगावाला.
गेल्या तीन वर्षांत भारत या सार्क संघटनेपासून दूर राहिला आहे.

पाकिस्तानात असलेल्या दहशतवादी नेटवर्कमुळे या क्षेत्राला भेडसावत असलेल्या सुरक्षा आव्हानाचा हवाला देत भारत या सार्क संघटनेपासून दूर आहे. निर्माण झालेले हे अंतर सार्कच्या अविरत प्रगतीमुळे दूर होईल अशी आशा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी 35 व्या सार्क दिनाच्या निमित्ताने दिलेल्या आपल्या संदेशामध्ये व्यक्त केली आहे. इम्रान खान यांनी सार्क प्रक्रियेबाबत पाकिस्तानच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चारही केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.