मेस्सीने मोडला रोनाल्डोचा विक्रम

माद्रिद: बार्सिलोनाचा प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने ला-लीगा फुटबॉल स्पर्धेत रियल मॅलोरका संघाविरुद्ध हॅट्ट्रिक नोंदविली. तसेच त्याने ख्रिस्तीयानो रोनाल्डोची 35 हॅट्ट्रिक घेण्याची कामगिरी मागे टाकून विक्रमाची नोंद केली.

बार्सिलोनाने हा सामना 5-2 अशा फरकाने जिंकला. या सामन्यात मेस्सीने 17 व्या, 41 व्या आणि 83 व्या मिनिटाला गोल केले. तर अँटोनी ग्रिझमन (7 मि.) आणि लुईस सुआरेझ (43 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला.

या विजयासह बार्सिलोनाने गुणतालिकेत 34 गुणांसह अव्वल स्थान मिळवले. गेल्याच आठवड्यात मेस्सीने बॅलन डीओर पुरस्काराने गौरविण्यात आले. रोनाल्डोच्या नावावर ला-लीगामध्ये 34 हॅट्ट्रिकची नोंद आहे.

मेस्सीच्या या मोसमातील गोल संख्या बारा झाली आहे. बार्सिलोनाकडून वेगवेगळ्या लीगमध्ये खेळताना मेस्सीच्या नावावर आता 431 गोल जमा झाले असून त्याने गोलच्याबाबत देखील रोनाल्डोला मागे टाकले आहे. रोनाल्डोच्या नावावर या स्पर्धेत 426 गोल आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.