#SAG2019 : नेपाळला नमवत भारतीय महिला फुटबाॅल संघाने पटकावले सुवर्णपदक

नेपाळ : भारतीय महिला फुटबाॅल संघाने तेराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सोमवारी यजमान नेपाळवर २-० ने मात करत सलग तिस-यांदा सुवर्णुदक पटकावले आहे. स्ट्राइकर बाला देवी ही पुन्हा एकदा भारतीय संघाची विजयाची शिल्पकार ठरली.

मणिपूरची २९ वर्षीय बाला देवी हिने अंतिम सामन्यात दोन्ही सत्रात १-१ गोल केले. तिने पहिल्या सत्रात १८ व्या तर दुस-या सत्रात ५६ व्या मिनिटाला गोल केले. बाला देवी या स्पर्धेत टाॅप स्कोरर राहिली, तिने चार सामन्यात एकूण पाच गोल केले.

अंतिम सामन्यात भारतीय गोलकीपर अदिती चौहान हिने शानदार कामगिरी केली आणि नेपाळचे गोल करण्याचे प्रयत्न फोल ठरविले. अदितीच्या दमदार खेळामुळे संपूर्ण स्पर्धेत भारताविरूध्द एकही गोल होऊ शकला.

Leave A Reply

Your email address will not be published.