अमृतसर -अमृतसरचे विद्यमान महापौर करमजीत सिंग गिंघू यांनी आज आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. आपचे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत रिंघू यांनी आपमध्ये प्रवेश केला.
विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच रिंघू यांनी कॉंग्रेस पक्ष सोडून आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळे कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने सरकार स्थापन केले तर अमृतसरला जागतिक दर्जाचे शहर बनवले जाईल, असे केजरीवाल यांनी यावेळी बोलताना सांगितले. पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे आणि 10 मार्चला मतमोजणी होणार आहे.