Bollywood News । नुकतेच अभिनेता पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांच्या एंगेजमेंटचे फोटो समोर आले होते. मात्र, दोघांनीही लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही. फेब्रुवारीमध्ये लग्न करू शकतात अशी चर्चा सध्या सोशलवर सुरु आहे. रकुल प्रीत आणि जॅकी भगनानीनंतर आता चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहे.
View this post on Instagram
क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर लीक झाली. कार्डमध्ये जोडप्याचा कोलाज आहे आणि त्यावर लिहिले आहे, ‘माझ्या लोकांसह उत्सव साजरा करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. पुलकित आणि क्रितीला खूप खूप प्रेम. यासोबतच दोघांच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे.’
वृत्तांनुसार पुलकित आणि क्रिती 13 मार्च 2024 रोजी लग्न करू शकतात. दोघांनीही लग्नाची तयारी सुरु केली आहे.’ पुलकित सम्राटचे हे दुसरे लग्न असेल.
त्याने पहिले काम सलमानच्या मानलेल्या बहिणीसोबत केले. पुलकितचे क्रितीसोबतचे हे दुसरे लग्न असेल. याआधी अभिनेत्याचे पहिले लग्न सलमान खानची राखी बहीण श्वेता रोहिरासोबत झाले होते. 2014 मध्ये पुलकित आणि श्वेताचे लग्न मोठ्या थाटात पार पडले होते. श्वेता अनेकदा पुलकितसोबत स्पॉट झाली होती. पण लग्नानंतर अवघ्या वर्षभरातच त्यांचे नाते बिघडू लागले दोघांमधील मतभेद इतके वाढले की श्वेताने 2017 मध्ये पुलकितपासून घटस्फोटासाठी अर्ज केला होता आणि अखेर दोघांचा घटस्फोट झाला. श्वेता रोहिरा ही सलमान खानची ‘राखी’ बहीण म्हणजे मानलेली बहीण आहे.
आता तो क्रितीसोबत एन्गेज आहे. 30 जानेवारीला क्रिती आणि पुलकितचा रोका सेरेमनी होता. आणि तिचे फोटोही शेअर केले. यावेळी फक्त कुटुंब आणि काही मित्र उपस्थित होते. मात्र सोशल मीडियावरील चर्चांवर या दोघांकडून अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही