Mayawati । बहुजन समाज पक्षाला मोठा झटका बसला आहे. आंबेडकरनगरचे खासदार रितेश पांडे यांनी बसपचा राजीनामा दिला आहे. रितेश पांडे यांनी पत्र लिहून बसपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बसपा सुप्रीमो मायावती यांनी भेटीसाठी वेळ न दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रितेश पांडेने पत्रात मायावतींवर आरोप केले आहे. पक्ष आणि कार्यकर्त्यांनी प्रत्येक पावलावर बोट धरून राजकारणात चालायला शिकवले.’ असेही ते म्हणाले आहे.
रितेश पांडेचा मोठा आरोप
रितेश पांडेने लिहिले की, ‘बऱ्याच दिवसांपासून त्यांना पक्षाच्या बैठकीत बोलावले जात नाही किंवा त्यांच्याशी कोणताही संवाद होत नाही. पक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी मी अनेक प्रयत्न केले पण यश आले नाही त्यामुळे पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही, असेही ते म्हणाले. राजीनामा तत्काळ स्वीकारावा, अशी विनंती रितेश पांडे यांनी पत्रात केली आहे. रितेश पांडे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 खासदारांसोबत जेवण केले तेव्हा त्यात रितेश पांडेचाही समावेश होता.’
रितेश पांडे यापूर्वी आंबेडकर नगर जिल्ह्यातील जलालपूर विधानसभा मतदारसंघातून बसपाच्या तिकिटावर आमदार होते. रितेश पांडेचे वडील राकेश पांडे हे बसपचे मोठे नेते आहेत आणि सध्या ते सपामध्ये आहेत. राकेश पांडे हे आंबेडकरनगरचे माजी खासदार आहेत. बीएसपीचे अनेक खासदार पक्षाचा राजीनामा देऊन भाजप किंवा सपामध्ये सामील होऊ शकतात, अशी अटकळ काही दिवसांपासून होती. रितेश पांडेच्या आधी मायावती यांनी बसपा खासदार दानिश अली यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. दानिश अली हा पक्षविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याचा आरोप बसपकडून करण्यात आला होता.