वडगाव मावळ – मावळ तालुक्यात करोना रुग्णांनी हजारी पार केली आहे. मावळ तालुक्यात शुक्रवार (दि. 7) 50 रुग्णांची भर पडली. तालुक्यात 1029 करोना रुग्ण आहेत. शुक्रवारी 6 करोना रुग्णांना घरी सोडण्यात आले. करोनावर सर्वाधिक कमी रुग्णांनी मात केली. शुक्रवारी शहरी भागात 25 व ग्रामीण भागात 25 रुग्ण आढळले.
मावळ तालुक्यात एकही मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरी भागात 507 व ग्रामीण भागात 522 रुग्ण आहेत. मावळचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून, शुक्रवारी सर्वाधिक 50 रुग्ण सापडून 1029 आकडा झाला आहे.
तळेगाव दाभाडे शहरात सर्वाधिक 345 रुग्ण आहेत. लोणावळा 94 व वडगाव नगरपंचायत 68 रुग्ण आहेत. शुक्रवारी तळेगाव दाभाडे शहरात 20 करोना रुग्ण आढळले आहेत. लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायत हद्दीत 2 रुग्ण सापडला आहे. तळेगाव दाभाडे ग्रामीण 8, गहूंजे 5, कामशेत 2, ब्राम्हणवाडी (साते) 2, परंदवडी, कडधे, कान्हे, सुदुंबरे, शिरगाव, सुडवडी, देवघर, पारवडी या गावात प्रत्येकी एक असे एकूण 50 करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
आतापर्यंत मावळ तालुक्यात 30 मृत्यू झाले. तालुक्यात शुक्रवारी (दि. 7) रोजी 6 रुग्ण घरी सोडण्यात आले. 303 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहे. आतापर्यंत 626 रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत. 72 जणांना घरीच विलगीकरण करण्यात आले. यामध्ये 10 रुग्ण गंभीर असून, 2 रुग्ण अत्यावस्थ गंभीर आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.