नवी दिल्ली : दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना साद क्राइम ब्रांच समोर हजर राहण्याची शक्यता आहे. तसेच त्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याचे त्यांच्या वकिलाचे म्हणणे आहे. काही दिवसापूर्वी दिल्ली पोलिसांच्या निर्देशानुसार मौलाना साद यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.
दिल्ली पोलीस मौलाना साद यांचा शोध घेत आहेत. त्यात दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचला अद्यापही यश आलेले नाही. काही दिवसांपूर्वी आज तक या वृत्तवाहिनीशी सद् यांनी संवाद साधला होता. त्यात त्यांनी म्हटले होते कि, दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचला मी कुठे आहे याची सर्व माहिती आहे. दिल्ली पोलिसांनी तशा दोन नोटीसही मला पाठवल्या आहेत. या नोटिसीला आम्ही आगोदरच उत्तर दिल्याचे ते म्हणाले होते.पोलिसांनी दिलेल्या सर्व निर्देशाचे मी पालन करीत असून कोरोनाचा चाचणीची माहिती दिल्लीत पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, साद यांच्या ऑडिओ क्लिप समाज माध्यमावर व्हायरल होत आहेत. मात्र साद कुठे आहेत याचा तपास अजून पोलिसांना लागलेला नाही. अंमलबजावणी संचालनालय, क्राइम ब्रांच, दिल्ली पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. त्यांच्याकडून पोलिसांना धक्कादायक माहिती मिळण्याची शक्यता आहे.