पाटील इस्टेट झोपडपट्टीत पोलिसांनी केलेल्या उपाययोजना यशस्वी
202 व्यक्ती आतापर्यंत करोनामुक्त
13 दिवसांत एकही करोना रुग्ण सापडला नाही
पुणे – शहरातील करोनाचा एक “हॉटस्पॉट’ ठरलेल्या पाटील इस्टेट झोपडपट्टीत पोलिसांनी केलेल्या उपाययोजना आणि नियोजनामुळे गेल्या 13 दिवसांत एकही करोना रुग्ण आढळला नाही. या भागात आतापर्यंत 210 करोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 202 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर, चौघांचा मृत्यूू झाला असून अन्य चौघांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे हा भाग करोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे.
झोन-4 मधील खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आतापर्यंत एकूण 236 करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला. यापैकी 210 रुग्ण एकट्या पाटील इस्टेट परिसरात आढळले होते. त्यापैकीच चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या परिसरात करोना पसरू नये, म्हणून पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना व योग्य नियोजन केले होते.
परिसरातील 1,342 जणांची करोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये आढळलेल्या बाधितांना तत्काळ उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तर, बाधितांच्या संपर्कातील 600 जणांना निकमार बालेवाडी, पॉलिटेक्निक कॉलेज शिवाजीनगर, सिंहगड इन्स्टिट्यूट येथे विलग करण्यात आले. स्वयंसेवी संघटनांतर्फे जीवनावश्यक वस्तू, फूड पॅकेट्स घरपोच पुरवण्यात आली. त्याचा फायदा आता दिसून येत आहे.
असे आहेत प्रतिबंधात्मक उपाय
– पाटील इस्टेटकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर
– 38 ठिकाणी बॅरिकेटिंग करून भाग पूर्णत: सीलबंद केला.
– क्विक रिस्पॉन्स टीम तैनात करून तातडीच्या सेवेसाठी स्वतंत्र
– पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक दोन ऍम्ब्युलन्ससह तैनात
– करोनाबाधित अथवा त्यांच्या संपर्कात आलेल्यांच्या
– घरी जाऊन वैद्यकीय तपासणी
– अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपूर्ण सुरक्षा घेत घरोघरी केले समुपदेशन.
– सार्वजनिक शौचालयांद्वारे करोना पसरू नये, म्हणून
– महापालिकेशी पत्रव्यवहार करत 20 फिरत्या शौचालयांची व्यवस्था
– परिसरात 7 ठिकाणी वॉश बेसिन बसवले
बंदोबस्ताची आखणी
– पाच ठिकाणी फिक्स पॉइंट व पाटील इस्टेट पुलाखाली नाकाबंदी
– वाकडेवाडी बसस्टॅंड ते पाटील इस्टेट झोपडपट्टी
– मार्गावर एसआरपीएफची तुकडी तैनात
– एक अधिकारी व 31 पोलीस
– कर्मचाऱ्यांचा फिक्स पॉइंट व पेट्रोलिंग
– दहा ठिकाणी सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेराद्वारे शुटिंग कंटेन्मेंट झोन असलेल्या भागावर नियंत्रण ठेवले.
– चौदा ठिकाणी वॉच टॉवर उभारून नागरिकांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष. विनाकारण फिरणाऱ्यांना प्रतिबंध