पिंपरी – नादब्रम्ह परिवार आयोजित मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत नाट्यमहोत्सव 30 ते 31 जानेवारी रोजी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार आहे, अशी माहिती संस्थेचे मुख्य विश्वस्त डॉ. रवींद्र घांगुर्डे यांनी दिली.
नाट्य महोत्सवात 30 तारखेला सायंकाळी साडे पाच वाजता “नादब्रम्ह’ प्रस्तुत “ललित नाट्यरंग’ ही लोकप्रिय नाट्यगीतांची सुरेल मैफल होणार आहे. त्यामध्ये ज्ञानेश पेंढारकर, डॉ. मुकुंद मराठे, संजय गोसावी, डॉ. वंदना आणि डॉ. रवींद्र घांगुर्डे सहभागी होणार आहेत.
31 तारखेला सायंकाळी साडे पाच वाजता “अनाहत’ निर्मित आणि प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र प्रस्तुत “शब्दांचीच रत्ने’ हा कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये मराठी कवींच्या कविता आणि गीतांची मैफल रंगणार आहे.
कार्यक्रमात गीतकार वैभव जोशी व सूत्रसंवादक म्हणून दीप्ती भागवत काम पाहणार आहेत.