बेल्हे – येथे गणेश सहकारी दूध डेअरीच्या वतीने सर्व गवळ्यांना मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. दूध घालण्यासाठी डेअरीत येताना मास्क घालून येणे बंधनकारक असून गवळ्यांना मास्क नसेल तर डेअरीत प्रवेश दिला जाणार नाही, असे डेअरीचे चेअरमन गोपाळा औटी यांनी सांगितले. तसेच डेअरीच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती दीपक औटी, गावचे सरपंच एम. डी. घंगाळे, बाळासाहेब हाडवळे, दुलबाजी औटी, ज्ञानेश्वर घंगाळे, लक्ष्मण घंगाळे, दूध संस्थेचे सचिव विशाल सहाणे आदी संचालक, दूध गवळी उपस्थित होते. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांकडून सर्व ठिकाणी शासकीय नियमांचे पालन होत आहे.