पुणे – गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी झेंडूच्या फुलांचे नियोजन सुरू केले आहे. परिणामी, मार्केट यार्डातील फुलबाजारात झेंडूची आवक घटली आहे. बाजारात मागणीही कमी असल्याने झेंडूचे भाव टिकून आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे अन्य फुलांचे भावही गेल्या आठवड्याच्या तुलनेत टिकून असल्याची माहिती व्यापारी सागर भोसले यांनी दिली.
फुलांचे प्रतिकिलोचे भाव
झेंडू : 30-50, गुलछडी : 100-150, अष्टर : जुडी 30-40, सुट्टा 150-250, कापरी : 20-40, शेवंती : 100-160, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : 10-30, गुलछडी काडी : 50-120, डच गुलाब (20 नग) : 40-100, जर्बेरा : 10-30, कार्नेशियन : 80-150, शेवंती काडी 150-200, लिलियम (10 काड्या) 800-1000, ऑर्चिड 200-400, ग्लॅडिओ (10 काड्या) : 50-80.