नवी दिल्ली – संपूर्ण देशात काल 5 मार्च रोजी एकाच दिवशी तब्बल 15 लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले. हा एक विक्रम मानला जात आहे. देशात 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले आहे. त्यानंतर प्रथमच एका दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात आले आहे.
कोविड लसीकरणाचा हा टप्पा 1 मार्च पासून सुरू झाला आहे. देशात आत्तापर्यंत 1 कोटी 94 लाख लोकांना लसीकरण करण्यात आले आहे. यातील 69 लाख 15 हजार 661 लोकांना पहिला डोस देण्यात आला असून 33 लाख 56 हजार 830 लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. सध्या 60 वर्षांवरील लोकांना आणि विविध व्याधी असलेल्या 45 वर्षांवरील लोकांनाही कोविडची लस दिली जात आहे. दरम्यान गेल्या 24 तासांत संपुर्ण देशभरात करोनाचे एकूण 18 हजार 327 नवीन रूग्ण आढळून आले आहेत.