नवी दिल्ली – काही दिवसांपुर्वी तृणमुल कॉंग्रेसचा राजीनामा दिलेले राज्यसभा सदस्य दिनेश त्रिवेदी यांनी आता भाजप मध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री पीयुष गोयल, तसेच धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
त्रिवेदी हे तत्वाने चालणारे राजकारणी आहेत, पण ते आत्तापर्यंत चुकीच्या पक्षात कार्यरत होते, त्यांनी आता योग्य मार्ग निवडला आहे असे नड्डा यांनी यावेळी नमूद केले. त्रिवेदी म्हणाले की या सुवर्ण क्षणाची मी गेले अनेक दिवस वाट पहात होतो. काहीं पक्षांमध्ये कुटुंब हे महत्वाचे मानले गेले आहे पण भाजपमध्ये मात्र लोकांना महत्व दिले जात आहे.
त्रिवेदी यांनी यावेळी पंतप्रधान मोदींच्या कार्याचाहीं गौरव केला. ते म्हणाले की मोदींनी देशातील कोविडची स्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली तसेच त्यांनी जगातील अन्य देशांशीही चांगले संबंध प्रस्थापित केल ेआहेत.त्यांच्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे.