नवी दिल्ली – भाजपतर्फे आज येत्या ८ फेब्रुवारी रोजी पार पडणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, हर्ष वर्धन व दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांच्या उपस्थितीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या भाजपच्या या निवडणूक जाहीरनाम्याचं नामकरण ‘दिल्ली संकल्प पत्र’ असं करण्यात आलं असून यामध्ये ‘भविष्यामध्ये दिल्लीचा चेहरामोहरा बदलून टाकू’ असं प्रमुख आश्वासन देण्यात आलं आहे.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पक्षाचे जेष्ठ नेते नितीन गडकरी यांनी, ‘देशाची राजधानी असलेल्या दिल्लीशी भाजपची नाळ जुळलेली असून आम्ही दिल्लीमध्ये विकासाची बुलेट ट्रेन चालवून दिल्लीला चेहरामोहरा बदलून टाकू.’ असं आश्वासन दिलं.
दिल्ली विधानसभा निवडणुकांतील ‘भाजप’च्या जाहीरनाम्याचे विस्तृत वार्तांकन थोड्याचं वेळात