maratha reservation : मराठा आरक्षणावरून (maratha reservation) मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यातील वाद आता आणखीनच वाढतांना पाहायला मिळत आहे. ज्या जालन्यातून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठीची लढाई सुरु केली, त्याच जालन्यात ओबीसी सभा घेत भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जरांगे यांना आव्हान दिले.
त्यामुळे आता भुजबळ यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी त्याच जालन्यात जरांगे (Manoj Jarange Patil) यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. 1 डिसेंबर रोजी जालना शहरातील आझाद मैदानात ही सभा होणार आहे.
मात्र, त्यापूर्वी पुण्यातील देहूमध्ये बोलताना जरांगे यांनी भुजबळांवर जोरदार घणाघात केल्याचं दिसून आलं आहे. “छगन भुजबळ यांचा मी व्यक्ती म्हणून सुद्धा विरोध करतो..’ असं विधान मनोज जरांगे यांनी केलं आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रात दौरा करत आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला विरोध करणाऱ्या ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर जरांगे पाटील हल्लाबोल करत आहेत.
मात्र, यालाच प्रत्युत्तर म्हणून आता जिरंगे यांनी भुजबळांवर टीकास्त्र सोडले आहे. ‘छगन भुजबळांसोबत माझे काही वाद होते. पण व्यक्ती म्हणून कधीच मी त्यांना विरोध नव्हता. मात्र आता व्यक्ती म्हणून सुद्धा विरोध आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. तसंच म्हातारा म्हणत’, जरांगे यांनी भुजबळांवर टीकास केलीय. पुण्यातील देहूमध्ये जरांगे पाटील बोलत होते.