मुंबई – माजी मिस वर्ल्ड मानुश्री छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. मानुश्री लवकरच अक्षय कुमारसोबत ‘पृथ्वीराज’मध्ये स्क्रीन शेअर करणार आहे. मानुश्री या चित्रपटात राजकुमारी संयोगिताच्या भूमिकेत दिसणार आहे. मानुश्री म्हणते की, चित्रपटात काम करणे आणि ही व्यक्तिरेखा साकारणे स्वप्नापेक्षा कमी नाही.
View this post on Instagram
अक्षय कुमारसारख्या सुपरस्टार आणि चंद्रप्रकाश द्विवेदीम सारख्या दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने मानुश्रीने तिच्या भूमिकेला “स्वप्न साकार होण्याची सुरुवात” म्हटले. चित्रपटाच्या नुकत्याच लाँच झालेल्या ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसादाने रोमांचित झालेली मानुश्री पुढे म्हणाली, “लोकांनी ‘पृथ्वीराज’च्या ट्रेलरमध्ये जे पाहिले आणि अनुभवले त्यावरून माझ्या अभिनयाचे कौतुक होत आहे हे आश्चर्यकारक आहे. माझ्यासाठी हे एक स्वप्नवत पदार्पण आहे. आणि मला राजकुमारी संयोगिताचे आयुष्य मोठ्या पडद्यावर जिवंत करण्याची संधी मिळत आहे याबद्दल मी खूप आभारी आहे.
View this post on Instagram
मानुश्री छिल्लर यातच चित्रपटाची अनुभव सांगताना पुढे म्हणाली, “अक्षय कुमारसारख्या देशातील सर्वात मोठ्या सुपरस्टारसोबत काम करणे ही एक मोठी जबाबदारी आहे, मला वाटते की मी ही भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे आणि सचोटीने साकारण्यासाठी माझे सर्व प्रयत्न केले आहे. त्यामुळे आज मला प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद मिळतो आहे.”
View this post on Instagram
‘पृथ्वीराज’ हा चित्रपट ‘पृथ्वीराज रासो’ या पुस्तकावर आधारित आहे,या चित्रपटात अक्षय कुमार एका महान योद्ध्याची भूमिका साकारत आहे जो निर्दयी आक्रमक मोहम्मदपासून भारताचे रक्षण करण्यासाठी पराक्रमाने लढला. हा चित्रपट यशराज फिल्म्सचा पहिला ऐतिहासिक चित्रपट आहे. ‘पृथ्वीराज’ हा त्रिभाषी चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये ३ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.