Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयी आणि प्राची देसाई लवकरच एका नव्या चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहे. सध्या दोन्ही स्टार्स त्यांचा आगामी चित्रपट ‘सायलेन्स 2’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. नुकतेच या दोघांना मुंबईमध्ये स्पॉट करण्यात आले. यावेळी दोघे खास लुकमध्ये पाहायला मिळाले.
सोशल मीडियावर त्यांचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. यावेळी प्राचीने लाल रंगाचा शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट परिधान केली होती. तर मनोज बाजपेयी निळा टी-शर्ट आणि कार्गो पँट घातलेला दिसत होता. दोघांनी गॉगल घालून आपला लुक पूर्ण केला होता. यावेळी तिला पापाराझी ‘लेडी दबंग’ म्हणताना दिसत होते. या लुकमध्ये दोघेही सुंदर दिसत होते. त्यांचा हा लुक चाहत्यांच्या देखील पसंतीस पडला आहे.
दरम्यान, 2021 चा थ्रिलर चित्रपट ‘सायलेन्स… कॅन यू हियर इट?’ अबन भरूचा देवहंस यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ही कथा एका महिलेच्या गूढपणे बेपत्ता होण्याभोवती फिरते. मनोज ‘सायलेन्स 2’ मध्ये एसीपी अविनाशच्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहे, ज्यात खोल रहस्ये आणि अनपेक्षित ट्विस्ट्सने भरलेली एक रोमांचक कथा आहे.
दरम्यान, अभिनेता मनोज बाजपेयी त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. हा अभिनेता अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसला आहे. आता अभिनेता त्याच्या आगामी ‘सायलेन्स 2’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. यात त्याच्यासोबत प्राची मुख्यभूमिकेत दिसणार असल्याने चाहत्यांना देखील या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.