Manasi Naik । मराठी अभिनेत्री मानसी नाईक ही आपल्या अभिनयापेक्षा सोशल मीडियावरील कारनाम्यांमुळे चर्चेत असते. त्यामुळेच मानसीच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालतात. काही दिवसांपूर्वी मानसीने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. या पोस्टमध्ये मानसीने नाव न घेता मानवी नात्यांवर भाष्य केले होते.
मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ रोजी झालं होतं. मात्र लग्नाच्या काही महिन्यातच मानसी नवऱ्यापासून वेगळं होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मानसीने घटस्फोटाबाबतच्या हालचाली देखील सुरु केल्याचं बोलल जात होत. अशात आता मानसीने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने नात्याबाबत थेटपणे भाष्य केल्याचे पाहायला मिळते.
मानसी व प्रदीप आता अधिकृतरित्या वेगळे झाले असून याबाबत दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती दिली आहे. अभिनेत्रीने या संपूर्ण प्रवासाबद्दल सविस्तरपणे तिच्या युट्यूब व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.
मानसी नाईक या व्हिडीओमध्ये सांगते, “मनोरंजन विश्वात कार्यरत असणाऱ्या कोणत्याही कलाकाराचं आयुष्य हे प्रायव्हेट नसतं. गेल्या वर्षभरात मी अनेक मुलाखतींमध्ये माझं मन मोकळं केलं आहे. सगळ्या मुलाखती, लाइव्ह सेशनमध्ये मी ताठ मानेनं माझं मत मांडलंय. मी कधीच खोटं बोलत नाही. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला माझा घटस्फोटाचा प्रवास आता संपलेला आहे. अधिकृतरित्या मी आता वेगळी झालेली आहे.”
गेल्या काही महिन्यांमध्ये मानसी तिच्या खाजगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत होती. सोशल मिडीयावर ऍक्टिव्ह असलेल्या मानसिला अद्याप बड्या ब्लॉकबस्टर चित्रपटाची प्रतीक्षा आहे. मात्र आजही मानसीची ‘बघतोय रिक्षावाला’ ‘बाई वाड्यावर’ या ही गाणी सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
हेही वाचा
महेश गायकवाड यांनी सांगितला रुग्णालयातला अनुभव म्हणाले,’श्रीकांत शिंदे माझ्या कपाळावरुन…’