मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा 100 वा भाग आज रविवारी 30 एप्रिल रोजी प्रसारित झाला. राजधानी दिल्लीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वी झालेल्या मन कि बातमधील अनेक आठवणींना उजाळा दिला. हा भाग देशभरातील 4 लाख केंद्रांवर थेट प्रक्षेपित करण्यात आला होता. ‘मन की बात’च्या या कार्यक्रमात देशभरातील विविध सामाजिक संस्था, नागरी संस्था आणि इतर संघटनाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
तसेच काही बॉलिवूड कलाकार देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. यामध्ये. अभिनेत्री माधुरी दीक्षित, रोहित शेट्टी, आमिर खान, अभिनेत्री रवीना आणि शाहिद कपूर हे देखील दिसून आले. आज सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम प्रसारित झाला. नऊ वर्षांपूर्वी 3 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू झालेला हा विशेष रेडिओ कार्यक्रमाने आज रविवारी 100 भाग पूर्ण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कार्यक्रमामुळे अनेकांचा रेडिओ ऐकण्याचा कल वाढला.
#WATCH| …”I felt inspired, if one leader can show us the right path, there is nothing impossible…”: Film Director Rohit Shetty after listening to 100th episode of #MannKiBaat pic.twitter.com/VNws0EQKkP
— ANI (@ANI) April 30, 2023
दरम्यान, यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी ‘मन की बात’ वरील पंतप्रधान मोदींच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली. यावेळी शाहिद कपुरने पंतप्रधान मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे कौतुक केले. ‘मोदींना लोकांसोबत कनेक्ट रहायचे होते आणि ते एका महान नेत्याचं काम आहे. तसेच, मला हे ऐकल्यानंतर खुप आनंद झाला”. असं शाहिद यावेळी म्हणाला.
#WATCH | After listening to the 100th episode of #MannKiBaat, actor Madhuri Dixit Nene says, “He (PM Modi) is taking out time to understand the problems of common people, this is amazing…” pic.twitter.com/mFjWVq36yU
— ANI (@ANI) April 30, 2023
तर दुसरीकडे प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दिक्षीतही या कार्यक्रमाला पोहचली होती. यावेळी ती म्हणली की, देशाचा इतका मोठा नेता जनतेसाठी इतका वेळ काढून असा कार्यक्रम घेत आहेत. ते खरचं खुप चांगला उपक्रम आहे. ग्लोबली त्यांची ओळख होत आहेत. हे आजच्या तरुण पिढीसाठी खुपच प्रेरणादायक असल्याचं माधुरी म्हणाली.