नागपूर – वाहन चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करून गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल नागपूर शहरातील धंतोली पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार माणिक दहिफळे यांच्या कामगिरीची पोलीस आयुक्त डाॅ. रविंद्र कुमार सिंघल यांनी प्रशंसा केली आहे. (Manik Dahiphale’s performance appreciated by Police Commissioner ravindra kumar singhal)
आयुक्त सिंघल यांनी दिलेल्या प्रशंसापत्रात लिहिले आहे, “पोलीस ठाणे धंतोली, नागपूर शहर येथील अप क्र. 75/2024 कलम 379 भादंवि व वाहन चोरीचे इतर 2 गुन्हे, तसेच इतर पोलीस ठाणे येथील वाहन चोरीचे 5 गुन्हे असे एकूण 8 गुन्ह्यातील वाहन चोरी करणारे टोळीला (आरोपींना) जेरबंद करून गुन्हे उघडकीस आणले आहे. सदरच्या टोळीमध्ये 3 आरोपींना निष्पन्न करून उपरोक्त गुन्ह्यातील संपुर्ण मुद्देमाल त्यात 20 दुचाकी वाहन हस्तगत करुन जप्त करण्यात आले आहे.
नमूद मालमत्तेच्या गुन्ह्याबाबत आपण तातडीने दखल घेऊन तपास पथकात सक्रिय सहभाग नोंदविला. सदर गुन्हेमध्ये तांत्रिक पद्धतीने पडताळणी करुन आरोपी वेळीच निष्पन्न तसेच संपुर्ण मुद्देमाल हस्तगत करुन अटक करण्यात आली.
अशा प्रकारे आपण मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणून उत्कृष्ट कामगिरी केल्याने जनमानसात व प्रसिद्धी माध्यमांमध्ये पोलिसांची सकारात्मक प्रतिमा निर्माण झाली. यासाठी आपले प्रयत्न कारणीभूत आहेत. याबद्दल आपली प्रशंसा करुन अभिनंदन करण्यात येत आहे.” असे प्रशस्तीपत्रात लिहिले आहे.