एकूण 17 जागा : विशेष ग्रामसभेत प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर
मंचर -मंचर (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीचे प्रभागनिहाय आरक्षण नुकतेच काढण्यात आले. सहा वार्डमधील 17 जागांसाठी हे आरक्षण रोटेशन पद्धतीने काढण्यात आले आहे. यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मंचर ग्रामपंचायतीचे प्रभागनिहाय आरक्षण ग्रामपंचायत कार्यालयात काढण्यात आले.
यावेळी सरपंच दत्ता गांजाळे, उपसरपंच धनेश मोरडे, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, राजू इनामदार, अरुण बाणखेले, वसंतराव बाणखेले, युवराज बाणखेले, प्रवीण मोरडे, संतोष गावडे, मंडलाधिकारी सुनील नंदकर, तलाठी विलास शिगवण, ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, आंबेगाव तालुक्यात 30 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. त्यामुळे गावपातळीवर स्थानिक नेते मोर्चेबांधणी करीत आहेत. त्यामुळे गावगाड्यातील वातावरण तापले आहे.
प्रारूप प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. त्यामुळे आता स्थानिक नेते निवडणुकीची तयारी करीत आहेत. तसेच प्रबळ उमेदवारांसाठी चाचपणी सुरू झाली आहे. ग्रामपंचायतीचा आखाडा आता चांगलाच तापला आहे.
आरक्षण पुढीलप्रमाणे
वॉर्ड क्रमांक 1- तीन जागा, सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. वॉर्ड क्रमांक 2 – तीन जागा,सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला, नागरिकांचा मागास. प्रवर्ग वॉर्ड क्रमांक 3 – दोन जागा,सर्वसाधारण,नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. वॉर्ड क्रमांक 4 – तीन जागा, सर्वसाधारण महिला, अनुसुचित जाती महिला,नागरिकांचा मागास प्रवर्ग. वॉर्ड क्रमांक 5 – तीन जागा सर्वसाधारण महिला, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. वॉर्ड क्रमांक 6 – तीन जागा, सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला.