न्यूयॉर्क – अमेरिकेत जेएफके आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय शिख टॅक्सी ड्रायव्हरवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. या हल्लेखोरावर द्वेष पसरवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्लेखोराने 3 जानेवारीला भारतीय शिख व्यक्तीचा फेटा ओढून काढला होता आणि “आपल्या देशात परत जा.’ असे ऐकवले होते. मुहम्मद हसानैन असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला गुरुवारीच अटक करण्यात आले होते.
पोर्ट ऍथोरिटी ऑफ न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी पोलीसांनी यांनी हसनैनच्या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हसनैनवर हल्ल्याच्या तिसऱ्या श्रेणीचा आरोप टेवण्यात आला आहे. त्याशिवाय द्वेष पसरवण्याला चिथावणी दिल्याच्या दुसऱ्या श्रेणीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
न्यूयॉर्कमधील शिख समुदाय आणि अधिकाऱ्यांनी दर्शवलेल्या पाठिंब्याबद्दल हल्ला झालेल्या शिख व्यक्तीने समाधान व्यक्त केले आहे. जर अशाप्रकारे कोणावर हल्ला झाल्यास जोरदार प्रत्युत्तर मिळायला हवे, अशी अपंक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.