गायक अरमान मलिक व संगीतकार आमल मलिक संगीतप्रेमींसाठी एक नवं बहारदार गीत घेऊन आले आहेत. ‘जरा ठहरो’ असे या गाण्याचे बोल असून डब्बू मलिक यांनी हे गाणं सह-निर्देशित केलं आहे. आतापर्यंत अनेक सुपरहिट गाणी देणाऱ्या मलिक फॅमिलीने लॉक डाऊननंतर नवं गाणं लॉन्च केल्याने चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच ठरली आहे.
यापूर्वीची मलिक कुटुंबीयांच्या ‘बोल दो ना ज़रा’, ‘मैं हूं हीरो तेरा’, ‘कौन तुझे’आणि ‘तुम्हे अपना बनाने का’ अशा अनेक गाण्यांनी रसिकप्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘जरा ठहरो’ हे गाणं देखील असंच रोमँटिक सॉंग आहे. या गाण्याद्वारे कपलमधील विरहाच्या काळात सोबत घालवलेल्या एका क्षणाची किंमत सांगण्यात आली आहे. अरमान यांनी कंपोज केलेलं ‘जरा ठहरो’ अरमान मलिक आणि तुलसीकुमार यांनी गायलं असून याचे बोल रश्मी विराग यांचे आहेत. हे गाणं गुलशनकुमार टी सिरीजद्वारे प्रस्तुत करण्यात आलंय.
या गाण्याला युट्युबवर मोठा प्रतिसाद मिळाला असून एका दिवसात ७० लाख लोकांनी हे गाणं पाहिलं आहे.
याबाबत बोलताना अरमान मलिक यांनी, ‘माझे वडील डब्बू मलिक आणि टीम ट्रिगर हॅपी यांनी व्हिडिओ ब्रेकडाउनची संकल्पना तयार केली, नंतर ती संपादित केली आणि एकत्र ठेवली, हे गाणे आश्चर्यकारक दिसते. या गाण्याची वस्तुस्थिती अशी आहे की आम्ही लॉकडाउन दरम्यान अगदी काही व्यावसायिकांसह या गाण्याची, शूटिंग आणि निर्मिती केली. तरीही हे एक मोठ्या रिलीजसारखे दिसते.हे असे काहीतरी आहे ज्याच्यावर मला दहा वर्षांनंतरही अभिमान वाटेल.” अशा भावना व्यक्त केल्या.