त्रिशूर (केरळ) – मल्याळम अभिनेता कोल्लम सुधी यांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातात अन्य तीन कलाकार देखील जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 37 वर्षीय कोल्लम सुधी यांच्या कारला सोमवारी पहाटे 4:30 च्या सुमारास त्रिशूरमधील कपमंगलम येथे अपघात झाला. सुधी वाटकारा येथील कार्यक्रमानंतर कोल्लमला परतत होते. यावेळी कॉमेडियन बिनू आदिमाली, उल्लास आणि महेशही त्यांच्यासोबत होते.
सुधी यांची कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहकाला धडकली. या अपघातात कोल्लम सुधी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना थिसुरमधील कोडुंगल्लूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, बिनू आदिमाली, उल्लास आणि महेश हे देखील जखमी झाले असून त्यांचा कोची येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.