मलायका अरोरा सोशल मीडियावर आपल्या फॅशन ट्रेन्डससाठी खूप ऍक्टिव्ह असते. ती सोशलूूूूूू मीडियावरच्या व्हिडिओमधून वेगवेगळ्या फॅशन टीप्स देत असते. याशिवाय तिच्या फिटनेस वर्क आऊटच्या व्हिडिओद्वारेही ती आपल्या फॅन्समध्ये अवेअरनेस करत असते. आता तिने एक नवीन नवीन फॉर्म्युला जाहीर केला आहे. गळणाऱ्या केसांवर तिने एक युक्ती सुचवली आहे. केस गळती थांबवण्यासाठी पहिल्यांदा आपला डाएट व्यवस्थित असायला पाहिजे.
कोविड-19 च्या संसर्गानंतर तिच्या केसांची खूप गळती होत होती. ही गळती रोखण्यासाठी आपल्या डाएटमध्ये व्हिटॅमिनचा समावेश केल्याचे मलायकाने सांगितले. याशिवाय केस गळती रोखण्यासाठी कांद्याचा रस काढावा आणि तो कापडाच्या बोळ्याने केसांच्या मुळाशी लावावा. थोड्या वेळानंतर केमिकल फ्री शॅम्पूने हा कांद्याचा रस धुवून टाकावा, असे मलायकाने म्हटले आहे.
एक आठवड्याच्या आत या फॉर्म्युलाने केस गळती कमी झाल्याचे निदर्शनास येईल, अशी खात्री मलायकाने दिली आहे. एका रिऍलिटी शोमध्ये मलायका सहभागी होत होती. मात्र कोविड-19 चा संसर्ग झाल्यावर तिने या शोमध्ये सहभागी होणे थांबवले होते. आता काही दिवसांच्या विश्रांतीनंतर ती पुन्हा या शोमध्ये सहभागी होण्याचा विचार करते आहे.