“उरी-सर्जिकल स्ट्राईक’मधील रोलमुळे लोकप्रिय झालेल्या विकी कौशलला एकापाठोपाठ एक छान रोल मिळायला सुरुवात झाली आहे. त्याने त्या भूमिकांना योग्य न्याय देखील दिल्याचा प्रेक्षकांचा प्रतिसाद आहे. त्याला आगामी काळात जे महत्त्वाचे रोल साकारायचे आहेत, त्यात महाभारतातील अश्वत्थामाची मध्यवर्ती भूमिकादेखील असणार आहे.
या भूमिकेसाठी विकीला आपल्या गेटअपमध्ये खूपच बदल करावे लागणार आहेत. विकी आपले वजन चक्क 100 किलोंपेक्षाही जास्तीपर्यंत वाढवणार आहे. त्यासाठी त्याला खास वर्कआऊटची देखील आवश्यकता भासणार आहे. याशिवाय त्याला घोडेस्वारी देखील शिकावी लागणार आहे.
या रोलासाठी विकीला क्रव मागा आणि जुजुत्सू सारख्या मार्शल आर्टचे प्रशिक्षणही घ्यावे लागणार आहे, असे दिग्दर्शक आदित्यने सांगितले. या सिनेमाचे शूटिंग युरोपात सुरू होणार आहे. विशेष करून ब्रिटन आणि आईसलॅन्डमध्ये या सिनेमाचा मुख्य भाग चित्रीत होणर आहे. मुख्य शूटिंगला पुढच्यावर्षी सुरुवात होणार आहे. या सिनेमाचे बाकी तपशील अजून पुढे यायचा आहे. याशिवाय शहीद उधमसिंग, फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचेही रोल विकी कौशलला साकारायचे आहेत.