बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरने नुकताच आपला 36वा वाढदिवस सेलिब्रेट केला. या खास दिवसी सोशल मीडियावर त्याच्या असंख्य चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या. तसेच अर्जुन कपूरची गर्लफ्रेंड अर्थात अभिनेत्री मलायका अरोराने देखील त्याला खास अंदाजात बर्थडे विश केले.
या खास दिवसानिमित्त मलायका अरोराने अर्जुन कपूरसोबतचा एक रोमांटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोत मलायका ही अर्जूनला प्रेमाने आलिंगन देताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत मलायकाने पोस्ट लिहिली की, “हॅप्पी बर्थडे माय सनशाइन.’
अर्जुन कपूरला वाढदिवसानिमित्त अन्य कलाकारांनीही शुभेच्छा दिल्या. मात्र, मलायकाने शेअर केलेल्या फोटोची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा होत आहे. तसेच हा फोटोही खूपच व्हायरल झाला आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंटस् देखील केल्या आहेत.
दरम्यान, अर्जुन कपूर आणि मलायका यांच्या रिलेशनबाबत सतत चर्चा सुरू असते. अर्जुन कपूर हा सतत मलायकासोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसत असतो. करोना काळातही दोघांना अनेकवेळा एकत्रित स्पॉट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अर्जुन कपूर पेक्षा मलायका ही 12 वर्षांनी मोठी आहे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास अर्जुन कपूर अखेरच्या वेळी “सरदार का ग्रॅंडसन’ चित्रपटात झळकला होता. यानंतर त्याचा लवकरच “भूत पुलिस’ हा चित्रपट प्रदर्शीत होण्याच्या मार्गावर आहे. दुसरीकडे मलायका अरोरा लवकरच “इंडियाज बेस्ट डान्सर’च्या पुढील सीजनमध्ये जज म्हणून दिसणार आहे.