आलिया भटचा लीड रोल असलेल्या “गंगूबाई काठियावाडी’मध्ये सुरूवातीपासूनच खूप अडथळे आले आहेत. सिनेमाचे काम प्रगतीपथावर असतानाच अनेक अडथळे आल्यामुळे सिनेमाचे शुटिंग वारंवार थांबवण्यात आले होते.
सर्वात शेवटी डायरेक्टर संजय लीला भन्साळी आणि स्वतः आलिया भट यांनाच करोनाची लागण झाल्यावर शुटिंगला ब्रेक लागला होता. आता मात्र प्रॉडक्शनने सिमेमाचे वहुतांश शुटिंग पूर्ण केले आहे. जे महत्वाचे शुटिंग आता पूर्ण झाले आहे.
View this post on Instagram
त्यामध्ये सिनेमातील एका गाण्याचाही समालेश आहे. या अखेरच्या टप्प्यातील शुटिंग पूर्ण करणे खरेच खूप अवघड होते, असे प्रॉडक्शनशी संबंधित सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्रात डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढायला लागल्यामुळे सगळ्यांच्याच मनामध्ये एक प्रकारची धास्ती होती.
पण सुदैवाने कोणालाही कोणताच त्रास झाला नाही. आता भन्साळी लवकरच आपल्या पुढच्या प्रोजाक्टच्या कामाला सुरुवात करणार आहेत.
ही “हिसा मंडी’नावाची एक वेबसिरीज असणार आहे. “गंगूबाई’चे काम आता संपले आहे. त्यामुळे तो सेट काढून टाकून “हिरा मंडी’चा सेट उभा केला जात आहे. त्याच ठिकाणी “हिरा मंडी’चे शुटिंग होणार आहे.