मुंबई – मलायका अरोरा आपल्या फिटनेस आणि स्टायलिश आउटफिट्समुळे कायमच चर्चेत असते. अभिनेता अरबाज खानपासून वेगळी झाल्यानंतर मलायका अनेकदा अर्जुन कपूर सोबत दिसली आहे. या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत. अशाच एका व्हिडीओमुळे सध्या मलायका आणि अर्जुन दोघेही चांगलेच चर्चेत आलेत.
हा व्हिडीओ एका अवॉर्ड फंकशन दरम्यानचा आहे. ज्यात मलायका आणि अर्जुन एकमेकांना मॅच असे कपडे घालून आल्याचे पाहायला मिळतंय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. लाईट ब्लु कलरच्या आऊटफिटमध्ये मलायका एकदम बोल्ड दिसली आहे. ट्रान्सपरंट असलेल्या ट्रेसमध्ये मलायका एकदम फिट असल्याचे वाटत आहे. विशेष म्हणजे मीडियासमोर जाताना एकमेकांच्या हातात हाथ घालून चालत गेल्याचे दिसत आहे.
View this post on Instagram
मलायका अर्जुन दोघेही अनेक दिवसांपासून एकमेकांना जास्त वेळ देत असलयाचे मीडियाच्या देखील लक्षात आल्यानंतर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. गेल्या वर्षी दोघेही मालदीवला सोबत गेल्याने त्यांच्या नात्याबद्दलच्या अनेक चर्चा देखील सिने सृष्टीत सुरु झाल्या होत्या. त्यात दोघेही एका अवॉर्ड फंक्शनसाठी सोबत आल्याने कॅमेऱ्याच्या नजरेतून वाचू शकले नाही.