मुंबई – बॉलिवूडमधील सर्वात चर्चित कपल म्हणजे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा. सध्या दोघेही युरोपमध्ये आपल्या सुट्ट्या एन्जॉय करताहेत. दोघेही युरोपमध्ये एकमेकांसोबत रोमँटिक वेळ घालवत आहेत. अशा परिस्थितीत मलायकाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरकल होत आहेत.
मलायकाने इंस्टाग्रामवर एक नाही तर तीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांना मिठी मारून पोज देताना दिसत आहेत. मलायकाने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘उबदार आणि आरामदायक’.विशेष म्हणजे यावेळी मलायकाने अर्जुनला टॅग देखील केले आहे. मलायकाचे फॅन्स यामुळे चांगलेच खुश झाले आहेत. अनेकांनी दोघे सोबत वेळ घालवत असल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे.
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांची लव्हस्टोरी काही मीडियापासून लपलेली नाही. सुरुवातीला दोघांनीही त्यांचे नाते अधिकृतपणे कबुल केले नाही, परंतु जेव्हापासून त्यांनी एकमेकांबाबत सोशल मीडियावर फोटोज शेअर करायला सुरुवात केली तेव्हापासून त्यांची चर्चा वाढू लागली. दोघेही अनेकदा व्हेकेशनवर आहेत.
View this post on Instagram
अर्जुन कपूर नुकताच ‘कुत्ते’ चित्रपटात दिसला होता. आता तो लवकरच ‘द लेडी किलर’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. याशिवाय तो ‘मेरे पति की बीवी’मध्ये देखील काम करणार आहे. तर नुकतंच मलायकाचं नवीन गाणे ‘तेरा की ख्याल’ रिलीज झाले. यामध्ये ती गुरु रंधावासोबत दिसली होती. दोघांना एकत्र पाहून मात्र फॅन्स चांगलेच खुश झाले आहेत.